- प्रस्तावना
आज एका मैत्रिणीशी भांडताना देव आहे की नाही या विषयावर भांडताना(बोलताना) हा मुद्दा माझ्या दृष्टिक्षेपातून मांडावा अस वाटल. मी यावर विचार करून आधी चर्चा केल्याचे अनुभव आठवून एक निष्कर्ष काढला आहे. अर्थात तो माझ्यापुरता मर्यादित आहे. तुमचा निष्कर्ष कदाचित वेगळा असू शकेल जर तो वेगळा असेल तर जरूर सांगा.
- देव: एक सनातन विषय.
देव या संकल्पनेचा उगम कधी झाला? या प्रश्नाचं उत्तर तिसरीच्या का चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं होत. आदिमानवाला वीज का चमकते? पाऊस का पडतो? ह्या प्रश्नांची उत्तर माहित नव्हती मग ह्या सगळ्या क्रिया प्रक्रिया नियंत्रित करणारी एक शक्ती आहे अस समजून तो त्या शक्तीची पूजा करू लागला आणि इथच देव ही संकल्पना अस्तित्वात यायला सुरुवात झाली. आणि त्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी खुश ठेवण्यासाठी कर्मकांडांची सुरुवात झाली. जगातील प्रत्येक संस्कृतीत देव जन्माला आले. या संकल्पनेचा वापर गुलामगिरी लादण्यासाठी उपयोग केला गेला. आजही हा देव आपला अंमल दाखवतो आहे. विविध जुनी नवी कर्मकांड देवाचा नावानं चालतात.(खासगीत सांगतो आमच्या चुलत चुलत्यान परवाच बोकड दिल). तर इतका प्रभावशाली आणि भरपूर चर्चिला गेलेला देव नक्की आहे की नाही ह्याची चर्चा करुया.
- देव म्हणजे नक्की काय?
ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो.[१] अतिनैसर्गिक निर्माता आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता (अमर्याद ज्ञान), सर्वशक्तिमानता (अमर्याद सामर्थ्य), सर्वव्यापकता (सर्वत्र असणे), सर्वकल्याणदृष्टी (परिपूर्ण चांगुलपणा), दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्व यांचा समावेश होतो. ....... (संदर्भ: विकिपीडिया)
निष्कर्ष: थोडक्यात देव हा दगडात नाही. हे सर्वमान्य आहे. ज्यांचा देव देवळात दगडात आहे त्यांनी आता विचार केला पाहिजे.
- याही पुढे!
बरेचजण जे माझ्याशी देव आहे अस पटवून देत वाद घालतात त्यांचं मत, देव दगडात नाहीच मुळी देव दगडात आहे अस मानणे ही अंधश्रद्धा आहे अस ते स्वतःच सांगतात. मग आता मुद्दा असा येतो की वरच्या व्याख्येत असणारा तरी देव आहे का?
stephen hawking अस म्हणतात की " अनंत अब्ज तारकाविश्वे, अगणित ग्रह तारे, असणाऱ्या विश्वाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात असणारी पृथ्वी आणि विश्वाच्या खिजगणतीतही नसणारी मानव जमातीच्या सुख दुखाःची नोंद देव ठेवत असेल यावर विश्वास ठेवणे अवघड आहे"
खरच हे खर वाटतयं पण तरीही जर देव आपला नियंत्रक असेल तर जगात सगळी माणस समान का नाहीत. वारकरी चालत पाय झिजवत जातो जो खरा भक्त आहे आणि आयते गिळणारे भांडवलदार कारने जातात अस का? अजूनही आतंकवादी का आहेत? हे सगळे प्रश्न पडले पाहिजेत. राहिला मुद्दा देवाच्या आकाराचा तो नक्की कसा आहे माणसासारखा की त्याला आठ हात आहेत? नक्की कसा? हा ही प्रश्न आहे. देव कुणीच पहिला नाही देव माझ्याजवळ आहे किंवा आहे माझ्यावर प्रसन्न आहे असाही कोणी नाही असेलच तर तो ते सगळ्याना पटवून देऊ शकत नाही. काहीजण असे म्हणतात की देव असेल तर माणस चांगल वाईट काम करताना विचार करतील देव या संकल्पनेच्या भीतीने वाईट काम करणार नाहीत. म्हणजे देव हा मानसिकदृष्ट्या सक्षम नसणार्यांसाठी आहे का?
- निष्कर्ष
हे सगळे प्रश्न मला निष्कर्षा पर्यंत आणून पोहोचवतात. देवाचा उगम अज्ञानातून झाला आज विज्ञानान त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उकल केली आहे. या सृष्टीचे काही नियम आहेत ते आपण समजावून घेऊ शकतो या पायावर विज्ञान उभ आहे. आणि अर्थातच आपण निसर्गाचे नियम मोडून काहीच करू शकत नाही. मग आता काहीजण म्हणतात की निसर्गाला देव मानायला काय हरकत आहे. जर निसर्गाला देव मानला तर पुन्हा कर्मकांड होऊ शकत. म्हणून निसर्ग मानू. देव या संकल्पनेपेक्षा अधिक व्यापक संकल्पना आपण अस्तित्वात आणू. म्हणूनच देव नाही. त्याच्या नावावर चालणारी देवळ, कर्मकांड आसाराम सारखे बापू यांना आपण हद्दपार करू. देवळात पडून असलेली अब्जो करोडो रुपयांची संपत्ती आता सगळ्यांसाठी वापरूया देवामुळेच आपली प्रगती अडून राहिली आहे. देव नाही....................
Nice article
ReplyDelete